पवारांच्या आत्मचरित्रात भाजप आणि फडणवीसांबाबत काय? ज्यामुळे रंगलं वाकयुद्ध?
पवार यांनी नैतिकतावरून भाजपला टार्गेट कलं होतं. तसेच भाजप नेत्यांमध्ये नैतिकता राहिलेलं नाही अशी टीका केली. त्यावर पवार याचं नैतिकतेशी संबंध आहे का असा पलवार फडणवीस यांनी केला.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता संघर्षाचा निकाल आल्यानंतर अनेक घडामोडींना वेग आला आहे. या दरम्यानच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात काही दावे केलेले आहेत. त्यावरून सध्या शरद पवार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलेला आहे. तर 2019 च्या निवडणुकीत झालेल्या वारपलटवारची पुर्नावृत्ती होताना आता परत दिसत आहे. पवार यांनी नैतिकतावरून भाजपला टार्गेट कलं होतं. तसेच भाजप नेत्यांमध्ये नैतिकता राहिलेलं नाही अशी टीका केली. त्यावर पवार याचं नैतिकतेशी संबंध आहे का असा पलवार फडणवीस यांनी केला. तर पवार यांनी भाजपला नैतिकता शिकवायची म्हटलं तर कठिणचं होईल. त्यासाठी इतिहासात जावं लागेल असा वार फडणवीस यांनी केला. तर आता पवार आणि फडणवीस यांच्यात रंगलेल्या या वाकयुद्धाकडे राज्यातील अनेकांच्या नजरा वळाल्या आहेत.