पहाटेचा शपथविधी हा कोणाला धडा होता? गनिमि कावा होता? की चूक? कोण कोणाला फसवलं?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी घडवून आणला. हे सरकार फार काळ टिकलं नाही. मात्र या पहाटेच्या शपथविधीची आजही चर्चा होते. आता पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीवरून राज्याचं राजकारण तापतामा दिसत आहे.
मुंबई : 2019 मध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत नव्हतं. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी घडवून आणला. हे सरकार फार काळ टिकलं नाही. मात्र या पहाटेच्या शपथविधीची आजही चर्चा होते. आता पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीवरून राज्याचं राजकारण तापतामा दिसत आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावरूनच मोठा गौप्यस्फोट केल्यानं हे प्रकरण परत चर्चेत आलं आहे. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठीच पहाटेचा शपथविधी करण्यात आला, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तर शरद पवार यांनी लोक माझे सांगाती भाग दोन या आपल्या पुस्तकात पहाटेच्या शपथविधीबाबत बोलताना म्हटलं आहे की, त्याबाबत आपल्याला काहीही कल्पना नव्हती. पण हे सगळ अजित पवार यांनी केलं होतं. त्यावरून आता राजकीय वाद होताना दिसत आहे. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. त्यांनी, मुनगंटीवारांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही असं म्हटलं आहे. तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना पहाटेचा शपथविधी हा ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी झाला होता. हे बरोबर आहे, त्यात चुकीचं काहीच नाही. राज ठाकरे यांनी भाजपची ही चूक होती असं म्हटलं आहे. त्यामुळे पहाटेचा शपथविधी हा कोणाला धडा होता की गनिमि कावा की चूक यावर हा स्पेशल रिपोर्ट