राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री अन् जयंत पाटलांच्या वक्तव्यावर संदीपान भुमरे यांचा जोरदार निशाना

राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री अन् जयंत पाटलांच्या वक्तव्यावर संदीपान भुमरे यांचा जोरदार निशाना

| Updated on: Apr 30, 2023 | 11:20 AM

जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येईल असं म्हटलं आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Politics) हे विविध कारणांनी चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यात मुख्यमंत्री कोण यावरून राळ उडली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे तर भावी मुख्यमंत्री पोस्टर्स लागत आहेत. त्यावरून राष्ट्रवादीच मुख्यमंत्रीपदावरून रस्सी खेच होताना दिसत आहे. यात विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) हे आघाडीवर दिसत आहेत. यादरम्यानच जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा केला आहे. त्यामुळे चर्चांना उत आला आहे. जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येईल असं म्हटलं आहे. त्यावर शिंदे गटाचे मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांचा जोरदार निशाना साधला आहे. तसेच राष्ट्रवादीचा कधीच मुख्यमंत्री होणार नाही असा घणाघात केला आहे. तर येणाऱ्या निवडणुकीत युती हा मोठा पक्ष असेल तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 30, 2023 11:20 AM