अजित पवार यांनी फटकारल्यावर अंधारे म्हणाल्या, ते एकटेच विरोधी पक्षनेते…
त्यावर अजित पवार यांनी अंधारे फटकारलं. तसेच त्या कोणत्या पक्षाच्या असा सवाल केला. तर त्यांनी शरद पवार यांच्याकडे रडूण गाऱ्हाणे मांडण्यापेक्षा उद्धव ठाकरे किंवा विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे जे त्यांच्या ठाकरे गटाचे आहेत. त्यांच्याकडे मांडा असे म्हटलं आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राज्यकारण तापलेलं आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटात या ना त्या मुद्द्यावरून ठिणगी पडताना दिसत आहे. यादरम्यान साताऱ्यातील एका कार्यक्रमात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शरद पवार यांच्याकडे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबदत तक्रार केली होती. त्यावरून चांगलेच राजकारण तापलं होतं. त्यावर अजित पवार यांनी अंधारे फटकारलं. तसेच त्या कोणत्या पक्षाच्या असा सवाल केला. तर त्यांनी शरद पवार यांच्याकडे रडूण गाऱ्हाणे मांडण्यापेक्षा उद्धव ठाकरे किंवा विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे जे त्यांच्या ठाकरे गटाचे आहेत. त्यांच्याकडे मांडा असे म्हटलं आहे. त्यावर अंधारे यांनी प्रतिक्रिया देताना, मी त्या दिवशी अजित पवार याचं नाव घेतलं नाही. तर ते एकटेच विरोधी पक्षनेते आहेत का? असा सवाल केला. त्याचबरोबर त्यादिवशीचं आपलं गाऱ्हाणं हे विरोधी पक्षातील प्रत्येकासाठी होतं असं म्हटलं आहे. तर अजित पवार मला का बोलता या प्रश्नाचे उत्तर देत असताना दादा तुम्ही आमच्या हक्काचे आहात. तुमच्यावर आमचा अधिकार आहे, तुम्ही आमचे आहात आणि अत्यंत आपुलकीने आम्ही तुम्हाला बोलत राहू फक्त तुम्ही आम्हाला परकं करू नका असं म्हटलं आहे.