वेदनादायी निर्णय, राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरुच; सांगलीत बड्या नेत्याने पद सोडलं
राज्यभर त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून कार्यकर्ते विनवणी करत आहेत. यादरम्यान अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा अथवा आंदोलन करू नये असे आवाहन केले होते.
सांगली : राज्यातील राजकीय वातावरण (Maharashtra Politics) वेगवेगळ्या घटनांनी ढवळून निघालेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) काल भूकंप आला. याभूकंपामुळे अख्खी राष्ट्रवादी हादरली असून त्याचे धक्के थेट पश्चिम महाराष्ट्रातही जाणवू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून आणि राजकीय निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर एकच खळबळ उडली आहे. त्यानंतर राज्यभर त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून कार्यकर्ते विनवणी करत आहेत. यादरम्यान अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा अथवा आंदोलन करू नये असे आवाहन केले होते. मात्र महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाचा सांगलीच्या सुरेश पाटील (Suresh Patil) यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादीमध्ये चांगलेच वातावरण चिघळले दिसत आहे. यावेळी पाटील यांनी, जो निर्णय घेतला आहे तो चुकीचा तर फार वेदना देणारा आहे. पवार यांनी