भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागणे हे हास्यास्पद; केंद्रीय मंत्र्याचा अजित पवार यांना टोला
मुख्यमंत्री पदाच्या चढा-ओढीतून भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागणे हे हास्यास्पद असल्याची टीका ही मंत्री आठवले यांनी केली आहे.
सांगली : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाचा चांगलाच गाजावाजा होताना दिसत आहे. त्यांचे भावी मुख्यमंत्री आशयाचे पोस्टर्स अनेक ठिकाणी लागत आहेत. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. यामुद्द्यावरूनच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देखील अजित पवार यांना टोला लगावत खोच टीका केली आहे. त्यांनी येथे राज्याचं मुख्यमंत्री कोणाला व्हावं असं वाटणार नाही. मला ही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं असं म्हटलं आहे. त्यांनी ही टिपणी सध्या राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या चढा- ओढीवरून केली आहे. तसेच मुख्यमंत्री पदाच्या चढा-ओढीतून भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागणे हे हास्यास्पद असल्याची टीका ही मंत्री आठवले यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.