मोठी बातमी! राष्ट्रवादीनंतर आता ‘या’ पक्षातही पडणार फूट; शिवसेना नेत्याचा मोठा दावा
त्यावरून शिवसेना व राष्ट्रवादीनंतर आता भविष्यात काँग्रेसही फुटणार असा दावा शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी काहीच दिवसांच्या आधी केला आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या राज्यकीय भूकंपावरून चर्चा रंगली होती.
मुंबई : राज्याच्या राजकारणार काही दिवसांपुर्वीच मोठा राजकीय भूकंप झाला होता. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडलं होतं. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह महत्वाचे नेतेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होते. त्यावरून शिवसेना व राष्ट्रवादीनंतर आता भविष्यात काँग्रेसही फुटणार असा दावा शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी काहीच दिवसांच्या आधी केला आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या राज्यकीय भूकंपावरून चर्चा रंगली होती. त्याचदरम्यान आता पुन्हा एकदा शिंदे गटातील एका मंत्र्यानेच काँग्रेस फुटणार हे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर राजकीय खळबळ उडाली आहे. यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हा धक्कादायक दावा करताना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसमधील काही आमदार फुटणार आहेत. तर तेही आता सरकारमध्ये सामिल होणार असल्याचे म्हटलं आहे. यावेळी त्यांनी यावरून, तुम्ही बघताय ज्या गोष्टी कधी लोकांच्या डोक्यात पण नाहीये त्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे आपण काहीच सांगू शकत नाही. माझ्या ऐकण्यात आहे की काँग्रेसचे आमदार तयारीत आहेत. त्यामुळे काही सांगता येत नाही, मी एक वेळेस नगरच्या सभेत सांगितलं होतं की विखे पाटील आणि त्यांचे मुलगा हा भाजपकडून निवडणूक लढवेल. तर मी दोन महिन्यापासून आपल्या सांगत होतो की अजित दादा आपल्याकडे येतील ते आले. आता काँग्रेसवाले येतील ते पण बघा असा दावाच त्यांनी केला आहे.