भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका; म्हणाले, चूक कळली असावी, म्हणूनच
मात्र फक्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वखुशीनं दिलेल्या राजीनाम्यानं सगळं नाट्यच पलटलं आणि हे सरकार वाचलं. न्यायालयाच्या या निकालानंतर राज्याचे उद्धव ठाकरे सहकुटुंब देवदर्शनासाठी निघाले.
अहमदनगर : महाराष्ट्रातील राजकीय सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. यामध्ये शिंदे गटातील आमदारांसह राज्यपाल आणि त्यावेळचे विरोधीपक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवरही सर्वोच्च न्यायालयानं आक्षेप घेतला. मात्र फक्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वखुशीनं दिलेल्या राजीनाम्यानं सगळं नाट्यच पलटलं आणि हे सरकार वाचलं. न्यायालयाच्या या निकालानंतर राज्याचे उद्धव ठाकरे सहकुटुंब देवदर्शनासाठी निघाले. त्यांनी शिर्डीतील साई मंदिरात साईंचे दर्शण, आणि शनिशिंगणापूर येथे शनिदर्शन घेतले. त्यावरून भाजपचे प्रदेश प्रवक्ते तथा विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी जहरी टीका केली आहे. त्यांनी, भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले असतानाही आम्हाला सोडून दुसऱ्या बरोबर लग्नगाठ बांधणारे उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नये, त्यांना ते शोभत नाही. अगोदर त्यांनीच नैतिकता घालवली. यातूनच ते शनिदेवाला का आले? हे समजून घ्यावे. त्यांना त्यांची चूक कळली असावी, असा टोला ही शिंदे यांनी ठाकरे यांना लगावला.