…तर आधी फडणवीस यांनी मग या मूर्खाना आवरायला हवं; राऊत यांनी कोणाला ठरवलं मुर्ख?
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि फडणवीस यांच्या विधानांचा समाचार घेतला. त्यांनी निकालाआधी निकाल काय लागेल असं बोलणं हा मूर्खपणा आहे, असं फडणवीस म्हणतात.
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) काऊंटडाऊन सुरू झाला आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. याच्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर टीका करताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनाम्याबाबत बोलणं म्हणजे मुर्खपणा आणि मूर्खांचा बाजार असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि फडणवीस यांच्या विधानांचा समाचार घेतला. त्यांनी निकालाआधी निकाल काय लागेल असं बोलणं हा मूर्खपणा आहे, असं फडणवीस म्हणतात. त्यामुळे फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष हे पाहून घेतील. तेच अनेक दिवस हे बोलत आहेत. आम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. निकाल आमच्या बाजूने लागेल, हा मूर्खपणा कोण करतंय. आता जर त्यांना बुद्धी सुचली असेल तर त्यांना बहुतेक सत्याची जाणीव झाली असेल. किंबहुना ते आणि त्यांनी ज्यांना मांडीवर घेतलं ते मूर्खच बोलताहेत निकाल आमच्या बाजूने लागेल. असं बोलणं हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. काय होतंय ते पाहूया. कोण कुठे जातंय की यांनाच पाताळात गाडलं जातंय. ते निकाल आल्यावर कळेल. फडणवीस म्हणतात की निकालाआधी बोलणं मूर्खपणा आहे. मग या मूर्खाना त्यांनी आवरायला हवं, अशी टीका राऊत यांनी केली.