दैनिक सामनाच्या अग्रलेखावरून शिंदे यांच्या मंत्र्याने राऊत यांची पार इज्जत काढली; म्हणाला, 'न्यायालयापेक्षा हे...'

दैनिक सामनाच्या अग्रलेखावरून शिंदे यांच्या मंत्र्याने राऊत यांची पार इज्जत काढली; म्हणाला, ‘न्यायालयापेक्षा हे…’

| Updated on: May 14, 2023 | 10:26 AM

तर त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कोर्टाने केल्या आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासहब ठाकरे गटातील नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली होती. तर दैनिक सामनातून टीका करण्यात आली होती.

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल आला. त्यावेळी न्यायाधिश यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. तर त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कोर्टाने केल्या आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासहब ठाकरे गटातील नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली होती. तर दैनिक सामनातून टीका करण्यात आली होती. याचदरम्यान विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या संदर्भात वेडावाकडा निर्णय घेतल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यावर आता शंभूराज देसाई यांनी हल्लाबोल केला आहे. त्यांनी 2019 मध्ये ठाकरेंची नैतिकता कुठे गेली होती? तर दैनिक सामनातून अग्रलेख लिहिणाऱ्यांनाच कायदा कळतो का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्याचबरोबर ठाकरेंनी सल्लागारांकडून कोर्टाचा निकाल समजून घ्यावा असाही घनाघात त्यांनी केला आहे. तर राऊत हे स्वत: ला सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं असल्याचं समजतात, अशी टीका केली आहे.

Published on: May 14, 2023 10:26 AM