Big news! अवघे काही तासाच उरले असतानाच, नरहरी झिरवळ बे पत्ता; गावात नाहीत? तर गेले कुठं?
राज्यातील 16 आमदारांच्या पात्र अपात्रेतवर थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र याच्याआधी झिरवळ नॉट रिचेबल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक : राज्याच्या सत्ता संघर्षावर (Maharashtra Power Crisis) आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देणार आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) हे सत्तेवर राहतं का? असा सवाल अनेकांच्या मनात पडला असतानाच आता नाशिकमधून एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) नॉट रिचेबल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. झिरवळ यांचा फोन लागत नाही आणि ते त्यांच्या गावीही नाही. त्यामुळे झिरवळ गेले तर कुणीकडे गेले? असा सवाल केला जात आहे. तर सत्ता संघर्षावर दुपारी 12च्या आत निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच झिरवळ नॉट रिचेबल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. निकालाच्या दोन दिवस आधी झिरवळ यांनी एक मोठं विधान केलं होतं.
Published on: May 11, 2023 09:27 AM
Latest Videos