पवारांनी अध्यक्षपद सोडलं; देवेंद्र फडणवीस म्हणाले की…

पवारांनी अध्यक्षपद सोडलं; देवेंद्र फडणवीस म्हणाले की…

| Updated on: May 03, 2023 | 7:47 AM

यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून, भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही आपली प्रतिक्रीया दिली. मात्र यावेळी फडणवीस सावध दिसले.

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. तसेच फक्त अध्यक्षपदचं काय तर आपण आता कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे पवार यांनी जाहीर केलं. त्यांनी ही घोषणा लोक माझे सांगाती या राजकीय आत्मकथा पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे उपस्थित असणाऱ्या अनेक नेत्यांना धक्काच बसल्याचे पहायला मिळाले. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून, भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही आपली प्रतिक्रीया दिली. मात्र यावेळी फडणवीस सावध दिसले. त्यांनी, शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे.

Published on: May 03, 2023 07:47 AM