Maharashtra Politics : ‘त्या’ 16 आमदारांच्या मुद्द्यावर पवार यांचे संकेत, एका वाक्यातच प्रश्न काढला निकाली; पहा काय म्हणाले
शिंदे सरकारला अबाधित ठेवलं मात्र 16 अपात्र आमदारांवर टांगती तलवार कायम ठेवली. या मुद्दा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देत त्यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यावर नार्वेकर यांनी प्रक्रिया सुरू केली आहे.
मुंबई : राज्याच्या राजकारणात सत्ता संघर्षाच्या निकालाने चांगचील कलाटनी दिली आहे. शिंदे सरकारला अबाधित ठेवलं मात्र 16 अपात्र आमदारांवर टांगती तलवार कायम ठेवली. या मुद्दा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देत त्यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यावर नार्वेकर यांनी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना पत्रकारांनी छेडलं असता त्यांनी एका वाक्यातच आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या प्रश्नाचं उत्तर देत निकालच लावला आहे. अजित पवार यांना शिवसेना कोणाची याबाबत अध्यक्षांनी घटना मागवल्या आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची असा सवाल केला होता. त्यावर अजित पवार यांनी, तुला सांगू का? शिवसेना कोणाची हे मतदारचं ठरवेल असं म्हटलं आहे. त्यामुळे अनेकांना आता राहुल नार्वेकर काय निर्णत घेतात याकडे लक्ष लागलं आहे.