Tejas Thackeray यांची लवकरच राजकारणात एन्ट्री होणार?-tv9
उद्धव ठाकरे कुटुंब प्रमुख, बाळासाहेब ठाकरे हिंदुरुदयसम्राट आणि आदित्य ठाकरे हे युवा नेतृत्व असे असतानाच तेजस ठाकरे यांचाही फोटो वापरण्यात आला आहे. आणि त्यावर युवा नेतृत्व असं म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारण सध्या दोन शिवसेना पहायला मिळत आहेत. एक तर उद्धव ठाकरे यांची आणि दुसरी म्हणजे शिंदे गटाची. यानंतर आता राज्याच्या राजकारणात आता ठाकरे कुटूंबातील आनखीन एक चेहरा दिसणार असे बोलले जात होते. तो चेहरा दहीहंडीच्या निनित्ताने राज्याच्या समोर आला. गिरगाव येथे शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात बॅनजरबाजी करण्यात आली आहे. त्यावर उद्धव ठाकरे कुटुंब प्रमुख, बाळासाहेब ठाकरे हिंदुरुदयसम्राट आणि आदित्य ठाकरे हे युवा नेतृत्व असे असतानाच तेजस ठाकरे यांचाही फोटो वापरण्यात आला आहे. आणि त्यावर युवा नेतृत्व असं म्हटलं आहे. त्यामुळे तेजस ठाकरे यांची लवकरच राजकारणात एन्ट्री होणार अशा चर्चा आता राजकारणात होताना दिसत आहे.
Published on: Aug 19, 2022 11:15 AM
Latest Videos