सर्वच शिंदे सोबत पळून गेले, मी एकटा काय करू?; शिवसेना नेत्यानं सांगितलं शिंदे यांच्याबरोबर जाण्यामागचं कारण?

सर्वच शिंदे सोबत पळून गेले, मी एकटा काय करू?; शिवसेना नेत्यानं सांगितलं शिंदे यांच्याबरोबर जाण्यामागचं कारण?

| Updated on: May 15, 2023 | 7:48 AM

महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून ठाकरे गट आणि शिवसेनेकडून टीका होत होती. ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यासह बंडखोरी केलेल्या आमदारांवर त्यांनी गद्दार असा उल्लेख होत होता.

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण अनेक कारणांनी ढवळून निघाले. त्यातच आता पहाटेच्या शपथविधीवरून देखील राजकारण तापलेलं आहे. त्यातच आता नेहमीच चर्चेत असाणारे शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुवाहाटीचं सत्य! गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचं तसंच एकनाथ शिंदे आणि भाजपसोबत जाण्याचं कारण सांगितलं आहे. मी तर 30 नंबरला गेलो होतो, माझ्याआधी 32 जण गेले होते असे ते म्हणाले. तर जळगाव जिल्ह्याचे पाच आमदार गेले होते, त्यापैकी चार आमदार माझ्याही पहिले पळून गेले. नागपूरचा ही पळून गेला, बुलढाण्याचाही पळून गेला, जळगावचे गेले नाशिकचे गेले, दादर ठाण्याचे सर्वच आमदार शिंदे सोबत गेले. नाशिक ते मुंबई मी एकटाच शिल्लक राहिलो होतो. त्यामुळं मी एकट्याने उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं? सर्वच शिंदे सोबत पळून गेले, चार खांदे गेले तर मी एकटा काय करू? असं पाटील म्हणाले. तर मी गेलो नसतो तर शिंदे आणि फडणवीस यांच्या माध्यमातून विकास ज्या प्रकारे होत आहे तो महाराष्ट्राचा विकास झाला नसता असंही ते म्हणालेत.

Published on: May 15, 2023 07:48 AM