‘आम्ही मुंबईत भुजबळ यांचा पराभव घडवून दाखवला, आता येवल्यात’; राऊत यांचा इशारा
तर ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तो प्रवेश करताना ठाकरे गटावर टिका केली होती.
पंढरपूर : राज्याच्या राजकारणात सध्या चिखल झाल्याची टीका होताना दिसत आहे. अशी टीका सर्वसामान्यांसह राज्यातील विरोधकही करताना दिसत आहेत. तर ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तो प्रवेश करताना ठाकरे गटावर टिका केली होती. तर त्याच्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते फूटत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले. त्यावरून राज्यातील राजकारण हे फार वेगळ्या वळणावर गेले आहे. याचदरम्यान शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत. तर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे देखील शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भुजबळ यांना टार्गेट करताना इशारा दिलाय. त्यांनी, भुजबळ हे आता विधानसभेत नसतील. आम्ही मुंबईत त्यांचा पराभव केला आहे. येवल्यात ही करू, येवल्याचा पुढचा आमदार हा शिवसेनेचा असेल असे त्यांनी म्हणताना हे पांडुरंगाच्या दारात सांगतोय असे म्हटलं आहे.