Union Cabinet Expansion : शिंदे यांच्या शिवसेनेतील दोघांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान? केंद्रीय मंत्री पद की राज्यमंत्री पद मिळणार?
कर्नाटक निवडणुकूनंतर केद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होईल आणि त्यात शिंदे गटालाही संधी मिळेत असे सांगण्यात येत होते. त्याप्रमाणे शिंदे यांच्या शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी याबाबत माहिती दिली.
मुंबई : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची शिवसेनेची साथ सोडून भाजप सोबत गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आता केंद्रातही दारं उघडी झाली आहेत. आधी भाजप सोबत गेल्याने शिंदे यांच्या गळात मुख्यमंत्रीपद दिलं गेलं. आता त्यांच्याबरोबर गेलेल्या 12 खासदारांपैकी 2 खासदारांना केंद्रात स्थान मिळेल अशी चर्चा सुरू आहे. कर्नाटक निवडणुकूनंतर केद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होईल आणि त्यात शिंदे गटालाही संधी मिळेत असे सांगण्यात येत होते. त्याप्रमाणे शिंदे यांच्या शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी ही माहिती देत असनाच, आपल्याला याबाबत काही माहिती नाही. जे होईल ते वरिष्ठ पातळीवर ठरेल. मात्र आमचे दोन खासदार हे मंत्रिमंडळात असतील हे मात्र पक्क असल्याचं ते म्हणालेत. त्यामुळे ते दोन खासदार कोण अशी चर्चा सध्या सुरू आहे.