नाशिक दौऱ्यात राज ठाकरे यांच्या बैठकांच सत्र; मनसैनिकांत धाकधूक की उत्सुकता?

नाशिक दौऱ्यात राज ठाकरे यांच्या बैठकांच सत्र; मनसैनिकांत धाकधूक की उत्सुकता?

| Updated on: May 21, 2023 | 10:45 AM

त्यानुसार मनसेचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. ते तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहे. यादरम्यान ते शाखाध्यक्ष आणि स्थानिक कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापले असून प्रत्येक पक्ष आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोटबांधणी करताना दिसून येत आहे. त्यानुसार मनसेचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. ते तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहे. यादरम्यान ते शाखाध्यक्ष आणि स्थानिक कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मनसे नेते पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे काय आदेश देतात याकडे लक्ष लागले आहे. तर राज ठाकरे शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी नाशिकमध्ये दाखल होताच ठाकरे यांचे मनसे सैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं होतं.

Published on: May 21, 2023 10:45 AM