Maharashtra power Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनामा शक्यतेवर फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सगळं...

Maharashtra power Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनामा शक्यतेवर फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सगळं…

| Updated on: May 11, 2023 | 12:28 PM

फडणवीस यांनी विरोधकांवर निशाना साधत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून कायम राहणार, ते राजीनामा देणार नाहीत तर पुढील निवडणूक त्यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याचे स्पष्ट केलं.

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) काऊंटडाऊन सुरू झालाय. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. हा निकाल आज येणार आहे. निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ज्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. फडणवीस यांनी विरोधकांवर निशाना साधत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून कायम राहणार, ते राजीनामा देणार नाहीत तर पुढील निवडणूक त्यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याचे स्पष्ट केलं. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनाम्याबाबत बोलणं म्हणजे मुर्खपणा आणि मूर्खांचा बाजार असल्याची टीका विरोधकांवर केली आहे.

Published on: May 11, 2023 07:45 AM