Maharashtra Poltical Crisis : सत्तासंघर्षावरून छत्रपती संभाजीराजे यांची शिंदे गटावर तिखट टीका, म्हणाले...

Maharashtra Poltical Crisis : सत्तासंघर्षावरून छत्रपती संभाजीराजे यांची शिंदे गटावर तिखट टीका, म्हणाले…

| Updated on: May 11, 2023 | 8:00 AM

काही महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होऊन राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. गेल्या नऊ महिन्यांपासून यावर सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्ष सुरु आहे. अशातच आज या सत्तासंघर्षांवर निकाल येणार आहे.

नांदेड : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आता अवघ्या काही तासांवर आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा (Maharashtra Politics) बदलवणारा हा निकाल असणार आहे. काही महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होऊन राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. गेल्या नऊ महिन्यांपासून यावर सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्ष सुरु आहे. अशातच आज या सत्तासंघर्षांवर निकाल येणार आहे. याच्याआधी सद्य स्थितीवर छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी दिली आहे. राज्याच्या सत्तासंघर्ष प्रकरणी लागणाऱ्या निकालाशी सर्वसामान्य जनतेला काहीही घेणं देणं नाही, आमदारांची खुर्ची टिकवण्यासाठी धावपळ सुरू आहे, अशा तिखट शब्दात टीका केली आहे. तर राजकारणाचा हा पोरखेळ अनेक वर्षांपासून सुरू असून लोक त्याला कंटाळले आहेत, अशी ही टीका त्यांनी केली आहे. ते नांदेड जिल्ह्यातील तामसा इथे पत्रकारांशी बोलत होते.

Published on: May 11, 2023 08:00 AM