Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचं शिवसेना हक्कावरून मोठं विधान; शिंदे गटाला मोठा धक्का

Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचं शिवसेना हक्कावरून मोठं विधान; शिंदे गटाला मोठा धक्का

| Updated on: May 11, 2023 | 1:40 PM

16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे गेलं आहे. यामुळे हा निर्णय शिंदे गटाला मोठा धक्का आणि दिलासा असा आहे.

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर (Maharashtra Political Crisis ) सर्वोच्च न्यायालयातून (Supreme Court) मोठी बातमी समोर येत आहे. सत्ता संघर्षाच्या निकालाचे वाचन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud) यांनी केले. यावेली त्यांनी, घटनापीठाने 10 प्रश्न तयार करत हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवले. 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे गेलं आहे. यामुळे हा निर्णय शिंदे गटाला मोठा धक्का आणि दिलासा असा आहे. मात्र यावेळी शिवसेनेवरील हक्कावरून न्यायालयाने मोठं विधान करताना मीच खरी शिवसेना असा दावा कुणी करू शकत नाही, असं निकालात म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर निवडणूक आयोग आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published on: May 11, 2023 01:40 PM