Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालाआधी मुख्यमंत्री शिंदे यांचं थेट विधान, म्हणाले, “सांगतो”
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याआधीच राजीनामा देतील, असा दावा काही कायदेतज्ज्ञांकडून आणि विरोधी पक्षाकडून केला जात आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Power Crisis) आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. न्यायालयाचा काय निर्णय येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याआधीच राजीनामा देतील, असा दावा काही कायदेतज्ज्ञांकडून आणि विरोधी पक्षाकडून केला जात आहे. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना विरोधकांवर टीका केली होती. त्यांनी शिंदे राजीनामा देतील, असं म्हणणं हा मुर्खांचा बाजार आहे असं म्हटलं आहे. तर यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, यावर बोलणं टाळलं आहे. त्यांनी सत्तासंघर्षावर सर्वांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर त्यांनी आधी निकाल येऊ द्या मग मी त्यावर बोलतो असेही म्हटलं आहे.