Maharashtra Political Crisis : आमच्या बाजूने लागेल, हा मस्तवालपणा; राऊत यांनी घेतला नार्वेकर यांचा समाचार
सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी, विधानसभा अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर तेव्हा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ बसले होते आणि त्यांनी जो निर्णय दिला तो कायदा, घटना आणि त्यावेळची परिस्थिती हे पाहून 16 आमदारांच्या बाबतीत निर्णय दिल्याचं म्हटलं आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्ट (Supreme Court) काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलं असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी, विधानसभा अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर तेव्हा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ बसले होते आणि त्यांनी जो निर्णय दिला तो कायदा, घटना आणि त्यावेळची परिस्थिती हे पाहून 16 आमदारांच्या बाबतीत निर्णय दिल्याचं म्हटलं आहे. ते प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. आताचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जे सांगतात की निर्णय माझ्याकडेच येईल. म्हणजे कोणाकडे येईल? तुम्ही पक्षपाती आहात. तुम्ही घटनाबाह्य सरकार बनवलं आहे. विधानसभा अध्यक्षपदाची तुमची नियुक्तीच घटनाबाह्य आहे. तेव्हा निर्णय तुमच्याकडे येऊच शकत नाही. तो निर्णय तेव्हाचे अध्यक्ष, जे घटनापीठावर बसले होते, त्या नरहरी झिरवळांकडे कायद्याने आणि घटनेने निर्णय त्यांच्याकडे यायला पाहिजे. मला न्यायाशिवाय कसलीही अपेक्षा नाही. आम्हाला सगळ्यांना न्यायाची अपेक्षा आहे. आम्ही न्याय विकत घेणारी माणसं नाहीओत. जे न्याय विकत घेऊ शकतात ते सत्तेवर आहेत. त्यांना जी खात्री वाटतेय की निर्णय आमच्या बाजूने लागेल वगैरे, तो आम्ही न्याय विकत घेऊ शकतो हा मस्तवालपणा आहे. आम्ही तसं म्हणणार नाही, आमचा न्यायावर विश्वास आहे, असं संजय राऊत म्हणाले