रोज सकाळी तेच तेच बोलत असतात, एकदा ते जोरदार आपटतील; संजय राऊत यांच्यावर शिवसेना नेत्याची सडकून टीका
महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होईल असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं होतं. तर राज्यात स्फोट होणार असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलं होतं.
सांगोला : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झालेली आहे. कोणत्याही क्षणी निकाल लागेल अशी स्थिती असतांना राज्यात अनेक घडामोडी होताना दिसत आहे. यादरम्यान कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांनी केला. त्यावर महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होईल असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं होतं. तर राज्यात स्फोट होणार असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावरही शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत चार महिने झाले असचं म्हणतं आहे. रोज सकाळी तेच बोलत असतात. एकदा ते जोरदार आपटतील. तेव्हा त्यांना कळेल, असा टोलाही त्यांनी लगावला. तर राऊत बडबडत असतात तरी काही झालं का? असा सवाल उपस्थित केला आहे. त्याचबरोबर तेच तेच बोलून राऊत आता बारीक झालेत असा टोला देखील शहाजीबापू पाटील यांनी राऊत यांनी लगावला आहे. त्यामुळे आता या टीकेवर राऊत हे काय प्रतिक्रिया देतात हे पहावं लागणार आहे.