Shahajibapu Patil | 'ज्यांची प्रवृत्ती राजकारणात खोक्यावर, तेच खोक्यावर बोलतात'- tv9

Shahajibapu Patil | ‘ज्यांची प्रवृत्ती राजकारणात खोक्यावर, तेच खोक्यावर बोलतात’- tv9

| Updated on: Aug 28, 2022 | 1:40 PM

यावेळी शहाजी बापू पाटील म्हणाले, ज्यांची प्रवृत्ती राजकारणात खोक्यावर गेली आता तेच खोक्यावर बोलत आहेत. तर ज्यांचं आयुष्यच खोक्यावर गेलं त्यांना आत खोकीच दिसतात असा टोला ही त्यांनी लगावला आहे.

गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष पेटलेला दिसत आहे. यावेळी विरोधकांविरोधात सत्ताधिकारी आणि सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक अशी आरोप प्रत्यारोपाची लढत रंगलेली आहे. यादरम्यान 50 ओके एकदम ओके ही घोषणा राज्यभर पसरली. तसेच देशपातळीवरही गेली. यावरून आता आणि शिंदे गटाचे तथा सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी विरोधकांसह शिवसेनेवर निशाना साधला आहे. तसेच पाटील यांनी सामनातून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर ही दिलं आहे. यावेळी शहाजी बापू पाटील म्हणाले, ज्यांची प्रवृत्ती राजकारणात खोक्यावर गेली आता तेच खोक्यावर बोलत आहेत. तर ज्यांचं आयुष्यच खोक्यावर गेलं त्यांना आत खोकीच दिसतात असा टोला ही त्यांनी लगावला आहे. सामनातून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, त्यामुळे आमचं काय होणार याची चिंता सामनाने करू नये असा खोचक सल्ला त्यांनी शिवसेनेला आणि शिवसेना नेत्यांना दिला आहे. तर ही वेळ तुम्हाला विचार करण्याची आणि उत्तर शोधण्याची असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.