अखेर तो दिवस आलाच! सत्तासंघर्षाच्या निकालाकडे उभ्या महाराष्ट्रासह देशाचं लक्ष, काय होईल सरकारचं?

अखेर तो दिवस आलाच! सत्तासंघर्षाच्या निकालाकडे उभ्या महाराष्ट्रासह देशाचं लक्ष, काय होईल सरकारचं?

| Updated on: May 11, 2023 | 7:07 AM

महाराष्ट्रासह देशाच्या नजरा लागलेल्या सत्तासंघर्षाच्या निकाल लागणार आहे. तो आज लागेल. शिंदेंच्या शिवसेनेच्या, 16 आमदारांच्या अपात्रेसंदर्भातला निकाल आज सुप्रीम कोर्टाचं घटनापीठ देईल.

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Power Struggle) निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे. उभ्या महाराष्ट्रासह अख्या देशाला ज्या निकालाची (Power Struggle Result) प्रतिक्षा होती तो दिवस ही उजाडला आहे. सत्तासंघर्षाच्या या यांचिकांवर सुप्रीम कोर्टातलं 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ निकाल देणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) 16 आमदारांचं काय होणार? याकडे लक्ष लागलंय. निकालातला सर्वात महत्वाचा मुद्दा असेल, 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण नेमकं कोणाकडे जाणार? घटनातज्ज्ञांच्या मते, सुप्रीम कोर्ट आमदारांना थेट अपात्र घोषित करणार नाही. त्यामुळं प्रकरण सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे येणार की तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळांकडे हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे हा निकाल, शिंदे-फडणवीस सरकारचंही (Shinde-Fadnavis Government) भवितव्य ठरवणारा आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट