….अन्यथा, आम्ही धमकी देत नाही, नाहीतर म्हणाल… राऊत यांचा नार्वेकरांना इशारा
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे लंडनमध्ये होते आणि तेथूनच ते मुलाखत देत होते. यावेळी त्यांनी या 16 आमदारांवर भाष्य केलं होतं. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नार्वेकर यांच्यावर टीका केली.
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट नेमका काय निकाल देणार त्यावरून राज्यात नेमकी उलट सुलट चर्चा सुरी असतानाच न्यायालयाने निकाल दिला आणि त्या 16 आमदारांचा जीव भांड्यात पडला. आपत्रतेचा निर्णय देताना न्यायालयाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात केला. त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे लंडनमध्ये होते आणि तेथूनच ते मुलाखत देत होते. यावेळी त्यांनी या 16 आमदारांवर भाष्य केलं होतं. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नार्वेकर यांच्यावर टीका केली. नार्वेकर यांच्या पक्षांतराचा इतिहास फार मोठा आहे. पक्षांतर हा त्याचा छंद आहे. तर पक्षांतरणाला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय असल्याची टीका राऊत यांनी केली. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करत नाही. फक्त सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देशाचे त्यांनी पालन करावं. अन्यथा हा महाराष्ट्र काय आहे ते आम्हाला दाखवावा लागेल. ही आम्ही धमकी देत नाही. परत म्हणतील आम्ही धमकी दिली असा टोला लगावला आहे.