Maharashtra Political Crisis | शिंदे-भाजप सरकारला जोरदार धक्का, गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर; सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन सुरू केले आणि पहिला झटका राज्यपाल, प्रतोद आणि व्हीपवर ताशेरे ओढत दिला. राज्यपालांनी कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणे चुकीचे असल्याचे म्हणत आमदारांच्या जीवाला धोका असणे म्हणजे सरकार अपात्र आहे, असे नाही असं म्हटलं आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयातून मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेनेतील सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पूर्ण झाली होती. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन सुरू केले आणि पहिला झटका राज्यपाल, प्रतोद आणि व्हीपवर ताशेरे ओढत दिला. राज्यपालांनी कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणे चुकीचे असल्याचे म्हणत आमदारांच्या जीवाला धोका असणे म्हणजे सरकार अपात्र आहे, असे नाही असं म्हटलं आहे. तर पक्षांतर्गत वादाकडे पाहण्याचा राज्यपालांना अधिकार नाही. सरकारवर शंका घेण्याचे राज्यपालांचे कारण नव्हते. बहुमत चाचणी बोलवण्याची गरज नव्हती असेही खडे बोल सुनावले आहेत. तर राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे आहेत. भरत गोगावलेंची प्रतोदपदी केलेली नियुक्ती बेकायदेशीर आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालात शिंदे-भाजप सरकारला जोरदार धक्का दिला. तसेच सत्तासंघर्षाचे प्रकरण 7 न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे सोपवले.