अपात्रतेची टांगती तलावार ज्यांच्यावर ते शिंदे गटाचे 16 आमदार कोण?
उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गट की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेमकं कोणाच्या बाजूने हा निकाल लागणार? याबाबतची उत्कंठा शिगेला गेली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Power Struggle) निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेल्या 9 महिन्यापासून सुरू असलेल्या याचिंकांच्या सुनावणीनंतर आज निकाल येणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा आज (11 मे) सकाळी 11 वाजता लागण्याची शक्यता आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलेलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ठाकरे गट की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना नेमकं कोणाच्या बाजूने हा निकाल लागणार? याबाबतची उत्कंठा शिगेला गेली आहे. मात्र कायदा तज्ज्ञांच्या मते हा शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात लागला तर शिंदे गटाचे तब्बल 16 आमदार अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ते 16 आमदार कोण? ते हे पहा….
Published on: May 11, 2023 07:25 AM
Latest Videos