फडणवीस यांच्या मी पुन्हा येईनच्या नाऱ्यावर शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया म्हणाले, आलेच की
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी या विधानावरून फडणवीसांना टोला लगावताना देवेंद्र फडणवीस हे पुन्हा आले हे खरं आहे. पण ते मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री बनून आले. माझा सारखा व्यक्ती असता, तर खालच्या पद मी स्विकारलंच नसतं, असं ते म्हणाले
सांगोला : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल हा आठवड्याभरावर येऊन ठेपलेला आहे. त्याच्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला. त्याचबरोबर त्यांनी मी कसा येतो हे माहितच असल्याचं म्हटलं होतं. त्यावर शिंदे गटाचे नेते आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी त्यांनी, पत्रकाराला झापत लबाड बोलू नको, लबाड बोलू नको असं म्हटलं आहे. तर ‘मी पुन्हा येईन’चा नारा त्यांनी दिला आणि ते आले आत्ता आहेतच की उपमुख्यमंत्री असं म्हटलं आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी या विधानावरून फडणवीसांना टोला लगावताना देवेंद्र फडणवीस हे पुन्हा आले हे खरं आहे. पण ते मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री बनून आले. माझा सारखा व्यक्ती असता, तर खालच्या पद मी स्विकारलंच नसतं, असं ते म्हणाले. तर फडणवीस यांचे मी पुन्हा येईन म्हणणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी चिंतेची बाब असल्याचं राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं होतं.