कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांचा NCP सह नवीन सरकार स्थापनेवर मोठा दावा

कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांचा NCP सह नवीन सरकार स्थापनेवर मोठा दावा

| Updated on: May 04, 2023 | 10:30 AM

आता पुन्हा एकदा सरोदे यांनी 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की असल्याचं ट्विट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर झाली आहे. त्याचा कधिही निकाल येऊ शकतो. तर 16 आमदार अपात्र ठरण्याची शक्यता असल्यानं शिंदे–फडणवीस सरकार पडेल, असं अॅड. असीम सरोदे यांनी याच्याआधीच म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा सरोदे यांनी 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की असल्याचं ट्विट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले. या निर्णयानंतर राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आपला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. शरद पवार यांनी अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याच्यावर देखील सरोदे यांनी भाष्य करताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मेच्या आधी नियुक्त्या नक्की होतील असेही म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवार आता आपला राजीनामा मागे घेणार नाहीत. ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे अध्यक्ष बलणार राष्ट्रवादीला आता नवा अध्यक्ष मिळणार हे नक्की झालं आहे.

Published on: May 04, 2023 10:06 AM