रविंद्र धंगेकर यांना लोक मतं देतील माहितीच होतं, कारण...; शरद पवार यांचं महत्वाचं विधान

रविंद्र धंगेकर यांना लोक मतं देतील माहितीच होतं, कारण…; शरद पवार यांचं महत्वाचं विधान

| Updated on: Mar 06, 2023 | 10:41 AM

लोकं आम्हाला सांगत होते की यश मिळेल. हे सामान्य लोकांकडून ऐकला मिळत होतं. मलाही खात्री होती, असंही पवार म्हणालेत. कसब्याची पोटनिवडणूक रविंद्र धंगेकर जिंकले, त्याची कारण काय? शरद पवार यांनी सविस्तर सांगितली आङेत.पाहा...

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला. धंगेकर यांच्या विजयाची कारण काय? यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “रविंद्र धंगेकर चारचाकित कधी बसत नाहीत. हा दुचाकीवर फिरणारा नेता आहे. म्हणून लोक त्यांना मतदान करतील हे माहिती होतं”, असं शरद पवार म्हणालेत. कसबा हा भाजपचा गड आहे. गिरीश बापटांनी तिथं प्रतिनिधित्व केलं आहे. बापटांची गोष्ट वेगळी होती. त्यांचे सर्वांशी मैत्रीचे संबंध होते. पण त्यामुळे मतदार संघ जड जाईल असं काही लोकं म्हणत होते. पण तिथं बापट आणि टिळकांना डावलून निर्णय घेतले गेला. त्याचा भाजपला फटका बसला, असंही शरद पवारांनी म्हटलं.

Published on: Mar 06, 2023 10:24 AM