पुणेकरांनो, आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा, आज PMPML बस रस्त्यावर कमी दिसणार, कारण...

पुणेकरांनो, आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा, आज PMPML बस रस्त्यावर कमी दिसणार, कारण…

| Updated on: Mar 06, 2023 | 9:24 AM

Pune PMPML Strike : पुण्यातील PMPML ठेकेदारांनी संप पुकारला आहे. बिलं थकल्याने त्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. थकीत बील लवकरात लवकर देण्याचं आवाहन त्यांनी प्रशासनाला केलं आहे. पाहा...

पुणे : पुणेकरांचे आज प्रवासाचे हाल होण्याची शक्यता आहे. कारण पुण्यातील रस्त्यांवर PMPML च्या कमी बसेस धावणार आहेत. पुण्यात PMPML ठेकेदारांनी संप पुकारला आहे. त्यांच्या या संपाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही ठेकेदार संपावर ठाम आहेत. ओलेक्ट्रा, हंसा, ॲंथोनी, ट्रॅव्हल टाईम या चार ठेकेदारांनी संप पुकारला आहे. 3 महिन्यांची बिलं थकल्याने हा संप पुकारण्यात आला आहे. ठेकेदारांचे थकले तब्बल 99 कोटी रुपये थकले आहेत. 900 बसेस धावणार नसल्याने प्रवाशांची मात्र हेळसांड होणार आहे.

Published on: Mar 06, 2023 09:24 AM