Maharashtra Rain Update : महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यातील ‘हे’ गाव पाण्याखाली, 4-5 फुटांवर पाणी!
पावसामुळे नद्यांना पूर आलेले असून कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. अशातच रायगड जिल्ह्यामधील एक गाव पाण्याखाली गेलं आहे.
आपटा : राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. याआधी यंदाचा पाऊल लांबणार असं बोललं जात होतं. मात्र हवामान खात्याने तीन ते चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे आता राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने जोरादार हजेरी लावली आहे. पावसामुळे नद्यांना पूर आलेले असून कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. अशातच रायगड जिल्ह्यामधील एक गाव पाण्याखाली गेलं आहे.
रायगड जिल्ह्यामधील आपटा हे गाव पाण्याखाली गेलेलं असून पाताळगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीशेजारी असलेल्या आपटा गावामध्ये पाणी शिरलं असून नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसांपासून गावात पाणी शिरलेलं आहे.
Published on: Jul 19, 2023 04:45 PM
Latest Videos