महाराष्ट्र अस्थिर दिसतोय, संविधानाची सर्वाधिक पायमल्ली सुरु; राऊत यांची सरकारवर घणाघाती टीका
देशात संविधान वाचवण्याची नितांत गरज आहे. कारण महाराष्ट्रातच संविधानाची सर्वाधिक पायमल्ली सुरु आहे. कायद्याचं राज्य मोडून काढलं जातं आहे.
मुंबई : महाराष्ट्र हे एक कायद्याचं राज्य म्हणून कायमच आघाडीवर राहिला आहे. पण हेच कायद्याचं राज्य अस्थिर दिसत आहे. महाराष्ट्राचा इतिहास नव्या पिढीला माहित नाही. महाराष्ट्रात काय महाभारत घडलं हे माहित नाही. यावर महाराष्ट्र सरकारने योजना तयार केली पाहिजे असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. तर देशात संविधान वाचवण्याची नितांत गरज आहे. कारण महाराष्ट्रातच संविधानाची सर्वाधिक पायमल्ली सुरु आहे. कायद्याचं राज्य मोडून काढलं जातं आहे. देशभरात ज्या अनेक गोष्टी घटनेच्या आधाराने निर्माण केल्या त्याची पायमल्ली केली जाते आहे. महाराष्ट्र आज अस्थिर दिसतो आहे त्याला पूर्णपणे जबाबदार संविधानाची पायमल्ली करणारे राज्य चालवत आहेत. राज्य आपल्या ताब्यात घ्यायचं ही प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती दिल्लीत आहे आणि महाराष्ट्रातही. त्यामुळे आज वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये वज्रमूठ सभा आयोजित केल्याचे राऊत म्हणाले. तसेच संविधान वाचवण्यासाठीच ही वज्रमूठ सभा आयोजित केल्याचे ते म्हणाले.