गाव एकजूट झालं अन् राज्याती सर्वात मोठी विहीर तयार झाली… पाहा व्हीडिओ…
सांगलीतील सलगरे गावात राज्यातील मोठी विहीर आहे. या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तानाजी पाटील यांच्यामुळे हे अशक्य काम शक्य झाले आहे आणि त्याच्या पत्नी सलगरे गावच्या सरपंच जयश्री पाटील आणि सलगरे गावचे माजी सरपंच तानाजी पाटील यांच्या शी बातचीत केली आहे आमचे सांगली जिल्हा प्रतिनिधी शंकर देवकुळे यांनी....
सांगली : सांगली भागात पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाईला ग्रामपंचायतींना तोंड देण्याची वेळ आज आली आहे. ही दुष्काळ परिस्थिती येण्यापूर्वी 7000 लोक वस्तीच्या सलगरे ग्रामपंचायतीने धाडसी निर्णय घेतला. अवघ्या दीड महिन्यात महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी विहीर सलगरे ग्रामपंचायतीने खोदली. 125 फूट रुंद आणि 95 फूट खोलीची विहीर खणण्यात आली. या विहिरीने गावच्या पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी प्रश्न लावला आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत मालकीची एकमेव सर्वात मोठी विहीर असल्याचा बहुमान मिरज तालुक्यातील सलगरे ग्रामपंचायतीला मिळाला आहे.
Published on: Mar 07, 2023 04:03 PM
Latest Videos