कर्ज काढून आमदार झालोय, पैशांची गरज, आमची पेन्शन बंद करू नये; शिवसेनेच्या आमदाराची प्रतिक्रिया

कर्ज काढून आमदार झालोय, पैशांची गरज, आमची पेन्शन बंद करू नये; शिवसेनेच्या आमदाराची प्रतिक्रिया

| Updated on: Mar 16, 2023 | 11:40 AM

Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेवर शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांच्या पेन्शनवरही त्यांनी भाष्य केलंय. पाहा संजय गायकवाड नेमकं काय म्हणालेत...

मुंबई : जुन्या पेन्शन योजनेवर शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांच्या पेन्शनवरही त्यांनी भाष्य केलंय. “पेन्शन योजनेवरून सध्या आंदोलन सुरु आहे. यात पेन्शनची मागणी करणारे बरेचशे कर्मचारी असे आहेत जे अजूनही सेवेमध्ये आहेत. 25 साली ते रिटायर होणार आहे. पण तरीदेखील त्यांच्याकडून सामंजस्याची भूमिका घेतली जात नाही. ज्या आमदारांना वाटतं की, त्यांची पेन्शन त्यांना नको त्यांनी खुशाल द्यावी. पण आमच्यासारख्या गोरगरिबांनी ज्यांनी कर्ज काढून इथंपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत, अशा आमदारांना पैशांची गरज आहे. पेन्शनची गरज आहे आणि त्यामुळे आमच्या पेन्शनचा विषय नाहीये, आम्ही पेंशन नको असं म्हणणार नाही”, असं संजय गायकवाड म्हणालेत.

Published on: Mar 16, 2023 11:40 AM