परिक्षेस आरंभ; बारावीच्या विद्यार्थ्यांना टीव्ही 9 मराठीकडून विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक!!

परिक्षेस आरंभ; बारावीच्या विद्यार्थ्यांना टीव्ही 9 मराठीकडून विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक!!

| Updated on: Feb 21, 2023 | 12:16 PM

राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झालाी आहे. यंदा 14 लाख 57 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 3 हजार 195 केंद्रावर बोर्डाकडून परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे. पाहा व्हीडिओ...

राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. यंदा 14 लाख 57 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 3 हजार 195 केंद्रावर बोर्डाकडून परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे. सोलापुरात बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देत ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात एकूण 53 हजार विद्यार्थी बारावीच्या परीक्षा देत आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये 114 परीक्षा केंद्रांवर होणार आहे. तर 14 संवेदनशील परीक्षा केंद्रांवर शिक्षण विभागाचे विशेष लक्ष आहे. कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी बैठं पथक तसेच भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

Published on: Feb 21, 2023 12:16 PM