SSC Exam | दहावीबाबत शिक्षण विभाग काढणार जीआर, 10वी उत्तीर्ण, 11वी प्रवेशाचे निकष ठरणार
महाराष्ट्र सरकारनं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 20 एप्रिल रोजी घेतला होता. दहावी परीक्षांबाबत शिक्षण विभाग एक ते दोन दिवसात दोन महत्त्वाचे जीआर काढणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना कसं उत्तीर्ण करायचं याबाबतचे निकष ठरवणारा एक जीआर काढण्यात येईल.अकरावीचे प्रवेश कसे होणार याबाबतचा दुसरा जीआर शिक्षण विभाग काढण्यात येणार आहे. शिक्षण खात्यांच्या अधिकाऱ्यांनी काल आणि आज अशी दोन दिवस राज्याच्या महाधिवक्तांबरोबर चर्चा केल्याची माहिती आहे. या दोन्ही जीआरची माहिती गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली जाणार आहे.
Latest Videos