Maharashtra HSC Class 12 Results : बारावीत 96.01 टक्के निकालासह कोकण विभाग सरस; मुलींनी मारली बाजी

Maharashtra HSC Class 12 Results : बारावीत 96.01 टक्के निकालासह कोकण विभाग सरस; मुलींनी मारली बाजी

| Updated on: May 25, 2023 | 1:15 PM

राज्याचा बारावीचा निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने या निकालात बाजी मारली आहे. 96.01 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. त्याचबरोबर 88.13 टक्क्यांसह मुंबई विभाग मागे राहिला आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल (HSC Results) जाहीर झाला आहे. यावेळी राज्याचा बारावीचा निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने या निकालात बाजी मारली आहे. 96.01 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. त्याचबरोबर 88.13 टक्क्यांसह मुंबई विभाग मागे राहिला आहे. तर विशेष बाब म्हणजे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 93.73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 89.14 टक्के आहे. याबाबत सकाळी 11 वाजता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली. तर विद्यार्थ्यांना दुपारी 2 वाजता निकाल पाहता येणार आहे.

Published on: May 25, 2023 01:15 PM