Heavy Rain Alert | मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये पुढील 3 तासात मुसळधार पावसाचा इशारा
पुढील 3 तासांत मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.
पुढील 3 तासांत मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे. उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहरे. तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातही ठिकठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सिंधुदुर्गमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.