मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच…
गंभीर आरोप असलेल्या आमदारांना तूर्त मंत्रिंपद दिले जाणार नाही अशी चर्चा आतील गोठातून आता चालू झाली आहे तर तरुण आणि विधानसभेवरच्या आमदारांना फक्त मंत्रिपदं देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले मात्र आता शिंदे-फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर मंत्री मंडळाचा विस्तार कधी होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत असतानाच आता 24 किंवा 25 तारखेला मंत्री मंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या दोन्ही तारखांकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच गंभीर आरोप असलेल्या आमदारांना तूर्त मंत्रिंपद दिले जाणार नाही अशी चर्चा आतील गोठातून आता चालू झाली आहे तर तरुण आणि विधानसभेवरच्या आमदारांना फक्त मंत्रिपदं देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published on: Jul 22, 2022 08:57 PM
Latest Videos