राज्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता; तापमानही वाढणार
पुणे शहराचे तापमान देखील 39 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर नागपूरच तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे : या आठवड्यात राज्यातील अनेक भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटसह पाऊस होण्याची शक्यता आहे. उष्णतादेखील वाढणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलंय. राज्यातील अनेक भागात सकाळी कडक ऊन आणि दुपारी जोरदार पावसाचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात चालू आठवड्यात देखील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने दर्शवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोकण अणि मराठवाड्यात पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात देखील पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र यासह कोकणात या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. तर राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेत मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे.