उद्या माहिती पडेल कॉमेडी सभा आहे की जनमानसची?; शिरसाट यांच्या टीकेला काँग्रेच्या नेत्याचं उत्तर
शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मविआची सभा ही सगळी कॉमेडी सभा असेल अशी टीका केली होती. त्यावर आता काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी उत्तर दिलं आहे.
छत्रपती संभाजीनगर : येथे उद्या (रविवार 2 एप्रिल) महाविकास आघाडीची जाहिर सभा होणार आहे. मात्र, रामनवमीच्या दिवशी संभाजीनगरमध्ये दोन गटांत झालेल्या राड्यामुळे संभाजीनगरात तणावपूर्ण शांतता आहे. तर मविआची सभा होणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष लागले असतानाच आता पोलिसांनी सभेसाठी 15 अटी घालत सभेला परवानगी दिली आहे. त्यामुळे सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. यादरम्यान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मविआची सभा ही सगळी कॉमेडी सभा असेल अशी टीका केली होती. त्यावर आता काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी उत्तर दिलं आहे. तसेच उद्या होणारी सभा ही कॉमेडी सभा आहे की जनमानसची हे ही कळेल असेही ते म्हणालेत. त्याचबरोबर जालना जिल्हा औरंगाबादला लागून असल्याने किमान दहा ते पंधरा हजार लोक आपण घेऊन सभेला हजर असणार. सभेत जालन्याची वर्जमुठ दाखऊ असेही ते म्हणाले. तर येत्या काळात राज्यात पुन्हा मविआचे सरकार येईल तेव्हा आपण शिंदेच्या वाचाळविरांचा सत्कार करू असेही त्यांनी म्हटलं आहे.