तुम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व महाविकास आघाडीच्या दावनीला बांधलं; शंभूराज देसाईंचा पलटवार
साहेब किती वेळा म्हणणार असा सवाल त्यांनी केला आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांचे वडील जरूर असतील परंतु ते युगपुरुष, राष्ट्रीय पुरुष आहेत
सातारा : महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘वज्रमूठ’सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. काय दिवटं, कार्टं आहे, याला बापही दुसऱ्यांचा लागतो, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. तर तुम्ही माझं काय चोरणार? माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद आणि माझ्यासमोर जे बसलेत, ते तर तुम्ही चोरू शकत नाही ना? असा घणागात केला होता. त्यावरून शंभूराज देसाई यांनी पलटवार केला आहे.
साहेब किती वेळा म्हणणार असा सवाल त्यांनी केला आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांचे वडील जरूर असतील परंतु ते युगपुरुष, राष्ट्रीय पुरुष आहेत. त्यांना एक महान व्यक्तिमत्व म्हणून राज्य, देश पाहतो. ते एकट्या ठाकरे परिवाराचे नाहीत. ते संपूर्ण हिंदुस्थानातल्या हिंदूंचे आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःच्या कुटुंबा पुरत मर्यादित करू नका. त्यामुले मुलगा म्हणून जेवढा अधिकार तुमचा आहे तेवढाच अधिकार हा प्रत्येक हिंदूंचा आहे. त्यामुळे नाव चोरण्याचा प्रश्नच येत. उलट बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन चाललोय. जे तुम्ही सुपुत्र असतानाही ते महाविकास आघाडीच्या दावनीला बांधलात.