Balasaheb Thorat: ओबीसींना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध - बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat: ओबीसींना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध – बाळासाहेब थोरात

| Updated on: May 07, 2022 | 4:54 PM

ओबीसींना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी भावना काँग्रेस  नेते बाळासाहेब थोरात यांनी ओबीसी आरक्षणाच्या संबधात बोलताना केला आहे.

अहमदनगर – आता कोण काय करत व कोण काय कारण शोधत, यापेक्षा ओबीसींना आरक्षण (OBC reservation)रद्द झाल्यानंतर न्याय कसा मिळेल यासाठी आमच्या महाविकास आघाडीने प्रयत्न केलेला आहे. आम्ही प्रयत्न करत राहू, तसेच ओबीसींना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी भावना काँग्रेस  नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat)  यांनी ओबीसी आरक्षणाच्या संबधात बोलताना केला आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून महाविकास आघाडीच्या निष्काळजीपणामुळे न्यायालयात (Court) हे आरक्षण टिकू शकलेले नाही असा आरोप ओबेसी नेत्यांकडून केले जात आहेत. यावर उत्तर देताना बाळासाहेब थोरात बोलत होते.