अजित पवारांनी नाना पटोलेंना सुनावलं; म्हणाले, टाळी...

अजित पवारांनी नाना पटोलेंना सुनावलं; म्हणाले, टाळी…

| Updated on: Apr 12, 2023 | 2:52 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वारंवार मविआत काय तरी अलबेल असल्यासारखं बोलत असतात. त्यांच्या अशा बोललण्याने आघाडीमध्ये अंतर पडू शकतं

मुंबई : महाविकास आघाडीत कोणताही ताळमेळ नसल्याचे अनेक वेळा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावरून समोर येत आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी, महाविकास आघाडी जर टिकवायची असेल तर बैठकीत बोलले पाहिजे, मीडिया समोर बोलण्याची गरज नाही. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वारंवार मविआत काय तरी अलबेल असल्यासारखं बोलत असतात. त्यांच्या अशा बोललण्याने आघाडीमध्ये अंतर पडू शकतं. यामुळे या गोष्टी बंद केल्या पाहिजे. ज्यावेळेस आमची महाविकास आघाडीची सभा होईल त्यावेळेस आपण याबाबत बोलणार असल्याचेही ते म्हणाले.