मविआच्या वेळी सडकून टीका आता सुर बदलेले; अजित पवार यांच्या बाबतीत भरत गोगावले म्हणतात...

मविआच्या वेळी सडकून टीका आता सुर बदलेले; अजित पवार यांच्या बाबतीत भरत गोगावले म्हणतात…

| Updated on: Jul 04, 2023 | 3:25 PM

निधी वाटपात दुजाभाव झाला अशी टीका सध्याचे शिंदे गटातील आमदारांनी करत शिवसेना सोडली होती. तर शिंदे गट तयार करत भाजपच्या सोबतीने शिंदे-फडणवीस सरकार आणलं. त्यानंतर आता एका वर्षानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत राजकीय भूकंप आणत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला.

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार हे अर्थमंत्री होते. त्याच्या काळात शिवसेना आमदारांवर अन्याय झाला. निधी वाटपात दुजाभाव झाला अशी टीका सध्याचे शिंदे गटातील आमदारांनी करत शिवसेना सोडली होती. तर शिंदे गट तयार करत भाजपच्या सोबतीने शिंदे-फडणवीस सरकार आणलं. त्यानंतर आता एका वर्षानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत राजकीय भूकंप आणत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता शिंदे गटातील काही आमदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यावेळी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना ज्यांच्यावर निधी वाटपावरून आरोप केला त्यांच्यासोबतच आता काम करावं लागणार असा सवाल केला. त्यावर गोगोवले यांनी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देशहितासाठी आणि महाराष्ट्रहितासाठी जे निर्णय घेतले आहेत त्या निर्णयाला सहकार्य करणे आम्हाला क्रमप्राप्त आहे. आता कुणाला कुठली खाती द्यायची ते हे तेच लोक ठरवतील. तर मागच्या वेळी जे काही झालं ते यावेळी होणार नाही यासाठीच अजित पवार यांना आम्ही स्विकारल्याचंही हे म्हणाले आहे.

Published on: Jul 04, 2023 03:25 PM