आमच्या 12-12 च्या फॉर्म्युल्यावर ते बोलायला तयार नाहीत, प्रकाश आंबेडकर पाहा काय म्हणाले
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला प्रत्येकी 12-12 जागाचा फॉर्म्युला दिला आहे. मात्र त्यावर महाविकास आघाडीकडून काही निरोप आलेला नाही. जर कोणीच आम्हाला बोलावले नाही तर भाजपाविरुध्द वंचित बहुजन आघाडी असा सामना होईल. आम्ही महाविकास आघाडीच्या निरोपाची शेवटपर्यंत वाट पाहू, नंतर मात्र उमेदवाराची निवड करण्याचा निर्णय घेऊ असे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
संभाजीनगर | 1 जानेवारी 2023 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला लोकसभेच्या प्रत्येकी 12 जागांचा फॉर्म्युला दिला आहे. परंतू यावर महाविकास आघाडीकडून निरोप आलेला नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या निरोपाची शेवटपर्यंत वाट पाहू, परंतू नंतर मात्र आमचे उमेदवार निश्चित करण्याचा आमचा कार्यक्रम राबवावा लागेल असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. मार्चमध्ये लोकसभेच्या निवडणूका होतील. जर केवळ शिवसेनेबरोबर आमची युती झाली तर अर्ध्या- अर्ध्या जागा आम्ही लढवू असेही त्यांनी सांगितले. आम्ही दिलेला फॉर्म्युला सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? हे त्यांनाच विचारा, अडीच वर्षे महाविकास आघाडी सत्तेबाहेर आहे. महाविकास आघाडीने या काळात 40 वेळा बैठका घेऊनही 48 जागांचे वाटप होत नसल्याने वेगळ्या चर्चांना सुरुवात होते असेही त्यांनी सांगितले.