मविआच्याच नेत्यांकडून अजित पवार यांना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न; भाजप नेत्याचा मोठा खुलासा
आम्हाला राष्ट्रवादीचा कोणताच नेता भेटला नाही किंवा भाजपच्या संपर्कात राष्ट्रवादीचा कोणताच नेता नव्हता असा खुलासा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
नांदेड : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर, ते भाजपमध्ये जाणार, बँगभरून तयार, दिल्लीत अमित शाह यांची त्यांनी भेट घेतली अशा एक ना अनेक अफवा होत्या. आम्हाला राष्ट्रवादीचा कोणताच नेता भेटला नाही किंवा भाजपच्या संपर्कात राष्ट्रवादीचा कोणताच नेता नव्हता असा खुलासा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. याचबरोबर कोणाशी कोणतीच चर्चा नव्हती. पण तरिही अजित पवार यांच्या बद्दल संशय निर्माण करण्यात आला. कदाचित अजित पवार मविआवरचढ ठरत असल्याने त्यांना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न मविआमधील लोकं करत असतील अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Published on: May 10, 2023 07:59 AM
Latest Videos